अकोल्यापासून चे अंतर : 2.5 कि.मी.
अकोले शहरालगत प्रवरा नदीच्या काठावर अगस्ति ऋषींचे भव्य मंदिर आहे. या परिसराला अगस्ति आश्रम म्हणून ओळखले जाते. अलीकडच्या काळात या मंदिरच्या ब-याच भागाचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तथापि जुन्या पाऊलखुणा डागडुजी करून जतन करण्याचा प्रयत्न मंदिर ट्रस्ट व स्थानिक भाविकांनी केला आहे. येथे दोन कुंड आहेत. उत्तरेकडील कुंड श्रीरामाच्या बाणाने तयार झाले अशी आख्यायिका रामायण या ग्रंथात आहे.
- अगस्तीमुर्ती स्थापना 21-2-59 वर्धापन दिन
- महाशिवरात्री महोत्सव अगस्त नाम सप्ताह शासकिय महापूजा
- अगस्त जन्म सोहळा तीन दिवस यात्रा
- तुकारामबीज महोत्सव
- शुध्दपाडवा ध्वजारोहन
- श्रीराम जन्मोत्सव
- हनुमान जंयती
- संत गोरोबा काका. श्री दिनी सह किर्तन सोहळा
- अगस्त्य ताऱ्याचा अस्त. पर्जन्य याग
- आषाढी एकादशी उत्सव
- संत नामदेव. सावतामाळी श्री दिनी सप्ताह
- संपूर्ण श्रावणमास सत्यनारायण पुजा महोत्सव
- अगस्त्य ताऱ्याचा उदय. नविन नदीचे पाण्याचे जलपूजन
- गणेशोत्सव
- काकडा आरती महोत्सव
- लक्ष्मी नारायण मुर्ती महोत्सव
- त्रिपूरी पौर्णिमा दिपोत्सव
- गुरू पौर्णिमा
- दसरा उत्सव
- दिपावली उत्सव
- प्रत्येक पंधरावडयांच्या एकादशी
- सोमवती आमवस्या
- मकर संक्राती स्नान
- सोमवती आमवस्या
- संपूर्ण अधिक मास अगस्त नाम सप्ताह
- ऋषी पंचमी
समाज प्रबोधन व समाजातील माणसाना सन्मार्गाला लावण्यासाठी अगस्ति ऋषींनी खूप परिश्रम घेतले. आदिवासी समाजाला कृषिविद्या शिकविली. “परोपकार करण्यासाठी दक्षिणेला जावे” या गुरु आज्ञेची आपल्या सेवेतून पूर्तता केली. महाराष्ट्रातील अगस्ति ऋषींचे हे एकमेव स्थान आहे. त्यामुळे दूर-दूरचे असंख्य भाविक आवर्जून दर्शनाला या ठिकाणी येत असतात.

0 Comments:
Post a Comment